१२ वर्षीय मुलाला धमकी देऊन अंधारात नेत अनैसर्गिक अत्‍याचार!

खामगाव शहरातील खळबळजनक घटना
 
file photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मारहाण करत १२ वर्षीय मुलावर जबरदस्ती अनैसर्गिक संभोगाचे खळबळजनक प्रकरण खामगाव शहरात समोर आले आहे. खामगाव शहर पोलिसांनी १६ वर्षीय विधिसंघर्ष मुलाविरुद्ध पोक्‍सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी तलाव रोड खदान भागातील २८ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, तिचा १२ वर्षीय मुलगा २ जानेवारीला रात्री ८ वाजता खेळत असताना घराजवळच राहणाऱ्या विधिसंघर्ष १६ वर्षीय मुलाने त्‍याला धमकी देऊन मोकळ्या जागेत अंधारात नेले.

तिथे मारहाण करत त्‍याच्यावर अनैसर्गिक संभोग केला. बालकाने दोन दिवस घरी काही सांगितले नाही पण त्रास होऊ लागल्याने काल आईला घडलेला प्रकार सांगितला. त्‍याच्‍या आईने त्‍याला घेऊन काल, ४ जानेवारीला दुपारी पोलीस ठाणे गाठले. तपास सहायक पोलीस निरिक्षक श्री. इंगळे करत आहेत.