तरुणीच्या घरावर ११ जणांचा हल्ला; आईलाही बेदम मारहाण!

ठरले हे क्षुल्लक कारण, खामगाव तालुक्‍यातील घटना
 
भरदुपारी गावात तलवार घेऊन फिरत होता, पोलिसांनी केले जेरबंद; खामगाव तालुक्‍यातील घटना
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २२ वर्षीय तरुणीच्या घरावर ११ जणांनी हल्ला चढवला. यात तिला आणि तिच्या आईला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना खामगाव तालुक्‍यातील शेलोडी येथे काल, ३० डिसेंबरला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तरुणीच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सौ. समृध्दी आकाश गोरे (२२) ही विवाहित तरुणी पुण्यात खासगी नोकरी करते. सध्या आईकडे शेलोडी येथे राहायला आली आहे. तिने या प्रकरणात तक्रार दिली. संजय अशोक इंगळे, सचिन मधुकर मोहाळे, किशोर कैलास इंगळे, जितू सिध्दार्थ इंगळे, अक्षय अशोक इंगळे, राजेश सिध्दार्थ इंगळे, अशोक श्रीपत इंगळे, सूरज मोहन तायडे, अरुण तुळशीराम मोरे, बंडू इंगळे, सुनिल इंगळे (सर्व रा. शेलोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.

हे ११ जण हातात लाकडी काठ्या घेऊन समृद्धीच्या घरी आले. तिच्या आईस म्‍हणाले, की तुझा मुलगा नाना पुणेकर याने आम्हाला दारू पिऊन शिविगाळ का केली. तिची आई आणि समृद्धी समजावून सांगत असताना त्‍यांनी या मायलेकीवर हल्ला केला. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत अश्लील शिविगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. काल रात्री १० वाजता समृद्धीने खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. सहायक फौजदार शत्रुघ्न बरडे यांनी तिची तक्रार दाखल करून घेत गुन्हा दाखल केला. तपास पोलीस उपनिरिक्षक श्री. राठोड करत आहेत.