धक्कादायक! त्याला वाटायचं लग्नाला मुलगी मिळणार नाही, म्हणून टोकाचा निर्णय घेतला! नांदुऱ्याची घटना

 
नांदुरा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या ४ ते ५ वर्षांपासून लग्न होत नसल्याने युवकाला नैराश्य आले, त्या नैराश्यात त्याने गळफास घेतला. नांदुरा खुर्द येथे ही धक्कादायक घटना घडली.

ज्ञानेश्वर रमेश गुजर (३६, रा.नांदुरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी मृतक ज्ञानेश्वर गुजर यांच्या लहान भावाने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ज्ञानेश्वर यांचे ४ ते ५ वर्षांपासून लग्न होत नव्हते. त्यामुळे ते नेहमी नैराश्यात राहत  होते." मला मुलगी मिळणार नाही, माझे लग्न होणार नाही" असे तो नेहमी म्हणायचा. 

  याच नैराश्यातून त्याने राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन जीवन संपवले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलींची घटती संख्या सामाजिक चिंतेचे कारण बनल्याचे या घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे.