२१ वर्षीय गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार

शेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
 
rape

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २१ वर्षीय गतिमंद तरुणीवर ३५ वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी पहुरपूर्णा (ता. शेगाव) येथे घडली. काल, १६ नोव्हेंबर रोजी पीडित मुलीच्या आईने शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली.

तक्रारीनुसार ,१५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असल्याने तरुणीची आई शेगाव येथे दर्शनासाठी गेली होती. गतिमंद तरुणी घरी एकटीच असल्याचे पाहून घरासमोर राहणारा गोपाळ मधुकर निंबाळकर (३५) हा घरात घुसला.त्याने गतिमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. मुलीची आई घरी आल्यानंतर तिने ही बाब आईला सांगितली. त्यानंतर काल, १६ नोव्हेंबर रोजी पीडितेच्या आईने पीडितेला घेऊन शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. रात्री उशिरा याप्रकरणी आरोपी गोपाळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.