कोरोना अपडेट ः नव्या २४३ बाधितांची भर!; ३२३ रुग्णांना डिस्‍चार्ज

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 27 जानेवारीला 243 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. दिवसभरात 323 रुग्णांना डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 817 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 574 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 243 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 232 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 459 तर रॅपिड टेस्टमधील 115 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 29, बुलडाणा तालुका : धामणगाव 1, डोंगरखंडाळा 1, नांद्राकोळी 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : उबाळखेड 1, चिखली शहर : 11, चिखली तालुका : वळती 2, भालगाव 1, अंचरवाडी 1, मलकापूर शहर : 2, मेहकर शहर : 30, मेहकर तालुका : घाटबोरी 2, चिंचोली बोरे 1, पांग्रा डोळे 3, दाभा 1, लोणी गवळी 3, शिवपुरी 1, उकळी 1, मादनी 2, लोणार शहर : 2, लोणार तालुका : किनगाव जट्टू 6, तांबोळा 1, मांडवा 1, बिबी 1, कुंबेफळ 1, खामगाव शहर : 77, खामगाव तालुका : गोंधनापूर 1, शेलोडी 1, घारोड 1, पिं. देशमुख 2, मुरंबा 2, उमरा 1, बोरी अडगाव 1, शहापूर 1, विहीगाव 3, गवंढळा 1, रामनगर 1, अटाळी 6, आंबेटाकळी 1, जळगाव जामोद तालुका : वडशिंगी 1, शेगाव शहर : 2, संग्रामपूर तालुका : वरवट बकाल 3, उकलगाव 1, वानखेड 4, दुर्गादैत्य 1, नांदुरा शहर : 8, नांदुरा तालुका : निमगाव 6, वडाळी 5, पिं. धांडे 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 243 नवीन संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहे.

उपचार घेणाऱ्यांची संख्या 2325 वर
उपचाराअंती 323 रुग्ण कोरोनामुक्त झााले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 771703 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 89150 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2140 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 92154 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 2325 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 679 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.