नवऱ्याला काही लाज? चक्क पोलीस ठाण्यात बायकोसोबत.....! मनाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला म्हणे आमच्या मधात....! वाचा खामगाव शहर पोलीस ठाण्यात काय घडल...

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
खामगाव शहर पोलीस ठाण्यात काल सकाळी एका महिलेच्या नवऱ्याने हद्दच पार केली. कुठे कसे वागावे हे त्या महिलेच्या नवऱ्याला काही कळलेच नाही. महिला नवऱ्याची तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात आली होती. याची कुणकुण तिच्या नवऱ्याला लागली. तिच्या नवऱ्यानेही पोलीस ठाणे गाठले अन् पत्नीसोबत जे करत होता ते पोलीस ठाण्यात करायला सुरुवात केली. माझ्याविरोधात तक्रार देऊ नको म्हणत बायकोची ओढतान केली, मारहाण केली, बायकोला खाली पाडले..आता पोलीस ठाण्यात असा राडा होतोय म्हणून त्या महिलेच्या नवऱ्याला समज द्यायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला देखील त्या महीलेचा नवरा भलत सलत बोलू लागला..तुम्ही आमच्या मधात बोलू नका असे म्हणत महिलेच्या नवऱ्याने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करीत धक्काबुक्की देखील केली.
नरेंद्र शिवाजीराव कुंदलवार (४३) रा. आठवडी बाजार ,खामगाव असे राडा करणाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरुध्द खामगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नरेंद्र कुंदलवार याची पत्नी १६ आक्टोबर रोजी पतीच्या विरोधात घरगुती कारणाने तक्रार देण्यासाठी खामगाव शहर पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी माझ्या विरुद्ध तक्रार देऊ नको असे म्हणत नवरोबाने स्वतःच्या पत्नीला चक्क पोलीस स्टेशनमध्ये ओढाताण करत, खाली पडले होते. यावेळी पोहेकॉ गजानन हरी पाटील (५५) हे त्यांच्या कर्तव्यावर हजर होते. ते नरेंद्र कुंदलवार याला समजावून सांगण्यासाठी गेले. मात्र कुंदलवार याने त्यांना तुम्ही आमच्या मध्ये बोलू नका,म्हणत शिवीगाळ केली.
  पोलीस कर्मचारी पाटील यांच्या अंगावर धावून जाऊन त्याच्या ड्रेसची कॉलर पकडून त्यांना लोटपाट केली. त्यामुळे पाटील यांच्या गणवेशाचे बटन तुटले.धक्काबुक्कीत डाव्या गालावर लागल्याने रक्त निघून सुजन आली आहे. अशी तक्रार पोहेकॉ गजानन हरी पाटील खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. तक्रारीवरून नरेंद्र शिवाजीराव कुंदलवार यांच्या विरोधात कलम ३५३,३३२,५९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पीएसआय लबडे करीत आहेत.