शॉकिंग! कोरोना रुग्णात ६ पट वाढ!! घाटाखालीही फैलाव
Jun 8, 2022, 18:23 IST
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ७ जूनच्या तुलनेत जिल्ह्यात आज कोरोना रुग्णाच्या संख्येत तब्बल ६ पट वाढ झाल्याचे चित्र आहे. कोरोना संख्या सिंगल डिजिट मध्ये असली तरी कदाचित येणाऱ्या धोक्याची सूचना असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुलडाणेकरांनो सावधान! असे म्हणावस वाटतंय...
तब्बल ४० दिवसानंतर जिल्ह्यात ७ जूनच्या अहवालात कोरोनाने अल्प पुनरागमन केलं ! काल बुलडाणा शहरात रुग्ण आढळून आला होता. आज तब्बल सहापट म्हणजे ६ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. काही महिन्यांपूर्वी हॉट स्पॉट असलेल्या बुलडाणा व नांदुरा तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आलाय. मात्र खामगाव तालुक्यात तब्बल ४ पॉझिटिव्ह आढळून आल्याने औद्योगिक नगरी हादरली ! यामुळे शासकिय निर्बंधा अगोदर नागरिकांनी स्वतःहून स्वतः साठी निर्बंध, स्वयंशिस्त लादून घेणे आत्तापासूनच गरजेचं ठरलंय हे नक्की...