जिल्हा परिषदेचे कर्मचारी उद्यापासून जाणार बेमुदत संपावर! वाचा काय आहे कारण...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा परिषदेचे कर्मचारी उद्या,२९ ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. विविध प्रलंबित मागण्यांवर जोपर्यंत शासनाच्या वतीने सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नाही असा इशारा महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या बुलडाणा शाखेने दिला आहे. तशा आशयाचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहिरात/अधिसूचना केलेल्या पदावरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय पारित झाला. मात्र सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना त्यात समाविष्ट करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जारी केला नाही. तो त्वरित जारी करण्यात यावा . निवृत्तीच्या वेळी शेवटच्या पगाराच्या ५० टक्के वेतन, महागाई भत्ता , वेतन आयोगाच्या वेळी निवृत्ती वेतनाची पुनर्रचना आधी आर्थिक लाभासह सहकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत..