नगरपालीकेच्या घंटागाडीने उडवल्याने झालेल्या अपघातातील तरुणाचा मृत्यू ! भालगाव गावावर शोककळा; काल चिखलीत झाला होता अपघात...

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली नगरपालीकेच्या घंटागाडीने दुचाकीला उडवल्याने दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना काल,२ डिसेंबरला चिखली ते मेहकर फाटा दरम्यान असलेल्या शुभम सेल्स समोर घडली. दरम्यान आज उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राहुल भोसले (२३, रा. भालगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
 
चिखली नगरपालीकेच्या घंटागाडीने दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार शुभम परिहार आणि राहुल भोसले हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते. राहुल भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले होते. मात्र राहुलने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. आज,३ नोव्हेंबरला राहुलची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली..
नगरपरिषद प्रशासनावर रोष...
दरम्यान या अपघातानंतर नगरपरिषद प्रशासनाने संवेदनशिलता दाखवायला हवी होती.नगरपरिषद प्रशासकांनी मृतक आणि जखमी तरुणाच्या नातेवाईकांची साधी विचारपूस देखील केली नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात येत आहे..