लढेंगे,जितेंगे,कटंगे मगर हटेंगे नही! स्वतंत्र विदर्भासाठी आता 'विदर्भ निर्माण यात्रा!' बुलडाण्यात माजी आ.वामनराव चटप म्हणाले..

विदर्भ राज्य वेगळे व्हावे यासाठी पुन्हा एकदा विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक झाली आहे. वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती "विदर्भ निर्माण यात्रा" काढणार असून येत्या २१ फेब्रुवारीपासून या यात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातून बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मधून तर पूर्व विदर्भातून सिरोंचा येथून ही यात्रा नागपूरकडे निघणार आहे.
वामनराव चटप पुढे म्हणाली की, सर्वसामान्यांना स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न कळवा आणि गावागावात व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशाने यात्रा काढण्यात येत आहे.'लाठी खाऊ, गोळी खाऊ,विदर्भ राज्य मिळवून जाऊ'.. असे एलान करीत यात्रा निघेल. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष थांबवायचा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायचे असतील तसेच नक्षलवादाला आळा घालायचा असेल तर विदर्भवाद्यांनी पुढे यायचे आहे. विदर्भातील माणसाला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वतंत्र विदर्भ हाच एकमेव पर्याय असल्याचे वामनराव चटप म्हणाले.