व्वा क्या बात! चिखलीच्या जय गणेश मंडळाने केला मुस्लिम बांधवांचा सत्कार; कारणही आहे "खास"...

 
fds

चिखली( गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनंत चतुर्थी व ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्याने चिखलीतील मुस्लिम बांधवांनी एक दिवस उशिरा ईद-ए-मिलाद साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. यानिमित्ताने चिखलीत धार्मिक एकोप्याचे दर्शन घडून आले. या निर्णयामुळे चिखलीतील जय गणेश मंडळाच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांचा सह्रदयतेने सत्कार करण्यात आला.  

यानिमित्ताने दोन्ही समाज बांधवांकडून आदर्श प्रस्थापित करण्यात आला असुन धार्मिक एकोप्याचे दर्शन घडवून दिले. हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतीक पुन्हा एकदा झळकून आले आहे.सत्कार करताना मंडळातील सचिन बोंद्रे,श्रीकांत टेहरे, नवरत्न सोळंकी, भारत दानवे संकेत बोंद्रे, सुयोग भालेराव चंदन कोठारी,रितेश सुराणा, गोपाल गोलाणी, प्रतीक टेहरे, गोपाल लहाने, निलय गोंदणे, नितीन लढा शिवम पांधी, यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.