चिंताजनक! दोनच दिवसांत जिल्ह्यात वाढले ३८ कोरोनाबाधित!!
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 829 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 813 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 16 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळा चाचणीमधील 13 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 212 तर रॅपिड टेस्टमधील 601 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
मलकापूर शहर : 5, बुलडाणा शहर : 4, देऊळगाव राजा शहर : 1, शेगाव शहर :2, शेगाव तालुका : खेर्डा 1, खामगाव तालुका : पेंडका पातोंडा 1, सुटाळा बुद्रूक 1, जळगाव जामोद शहर :1
तिघांना डिस्चार्ज...
उपचाराअंती 3 रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आजपर्यंत 750636 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86994 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 651 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87737 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 67 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 676 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.