सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! पुढील ५ दिवस असे राहील हवामान. रब्बी पिकाची तयारी करणाऱ्यांना दिलाय महत्वाचा सल्ला...

 
Jfjcj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सध्या सोयाबीन सोंगण्याचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे पावसाची अडचण येऊ नये अशी अपेक्षा शेतकऱ्यांची असते.शेतकऱ्यांसाठी दिलास देणारा अंदाज हवामान खात्याकडून आज वर्तवण्यात आला आहे.
जिल्ह्यात २४ ऑक्टोबर पर्यंत हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे. तसेच यादरम्यान आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याने उकाड्यापासून देखील सुटका मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन सोंगणाऱ्या मजुरांचा उकाड्यापासून सुटका होणार आहे.
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी करतांना रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी, ज्यामुळे इतर पेरणी पद्धतीच्या तुलनेत बियाणे कमी लागते व पिकांत आंतरमशागतीची कामे सहजतेने करता येतात असा सल्ला जिल्हा कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना दिला आहे.