चिखलीतील मुख्य प्रवेशद्वाराचे काम संथगतीने ; वाहतुकीची होतेय कोंडी ! प्रवासी त्रस्त..

 
चिखली(ऋषी भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली शहरातील खामगाव चौफुलीला लागून असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराचे काम गेल्या तीन महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. सदर प्रवेशद्वाराची एक बाजू बंद असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. आठ दिवसांपासून खांब ठोकून ठेवल्याने प्रवाश्यांना यातून जाताना त्रास भोगावा लागतोय. अनेकदा चारचाकी, दुचाकी वाहने एकत्रित आल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे दिसले आहे. या प्रवेशद्वाराचे काम तात्काळ केल्या जावे. यासाठी संबधीत ठेकेदाराने विशेष लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. 
बुलढाणा मार्गे शहरात प्रवेश करण्यासाठी या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करावा लागतो. दररोज शेकडो वाहनांची वाहतूक या द्वारातून जाते. त्यामुळे हा रस्ता आणि प्रवेशद्वार अत्यंत महत्वाचे आहे. फेब्रुवारी मध्ये याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शहर सुशोबिकरनामध्ये हे प्रवेशद्वार समाविष्ट आहे. या प्रवेशद्वाराचे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेवुन खुला करण्यात यावा अशी मागणी केल्या जात आहे