विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन! असे व्हा सहभागी...

 
Gvbb
बुलडाणा(जिमाका): क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि क्रीडा वातावरण निर्माण होण्यासाठी हॉकीचे जादुगर स्व. मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त दि. २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. २१ ते २९ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमा पुजन, त्यांच्या जीवनावर व्याख्यान, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूचा सत्कार, मान्यवरांचे खेळाडूंना मार्गदर्शन, विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
यावर्षी शालेय व अधिकृत एकविध खेळ संघटनांतर्फे अधिकृत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य तथा सहभाग घेतलेल्या खेळाडूंनी प्रमाणपत्राची छायांकीत प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावी. प्रमाणपत्र सादर करणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूचा प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येईल. यासाठी खेळाडूंनी सहकार विद्या मंदिर येथे दि. २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.