गौरी सजावट स्पर्धेत महिलांनी सहभागी व्हा ! ॲड वृषालीताई बोंद्रे यांचे आवाहन! हिरकणी महिला प्रतिष्ठानचे आयोजन...

 
vb

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) चिखली परीसरासह जिल्हयातील महिलांच्या कल्पकतेला आणी सृजनशिलतेसह सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उदांत हेतुने हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने जिल्हास्तरीय गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार असुन स्पर्धेत शहरी व ग्रामीण महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिरकणी महिला प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा ॲड वृषालीताई बोंद्रे यांनी केले आहे.

हिकरणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या माध्यमातुन महिलांचा सर्व स्तरातून विकास व्हावा, या उद्देशाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मीक, आर्थीक आणि आरोग्य विषयक विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. गौरी (महालक्ष्मी) सजावट स्पर्धेच्या माध्यमातुन सन २०२१ पासून स्त्रियांचा उत्साह वाढविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या स्पर्धेत आकर्षक सजावट, मखर डेकोरेशन, रांगोळी, फुलोरा, त्याचबरोबर गौरींची आकर्षक वेशभुषा, अलंकार परिधान, अशा विविध छटा दर्शविणाऱ्या गौरी या स्पर्धेचे आकर्षण ठरणार आहे. २१ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. प्रथम विजेत्यास आकर्षक पैठणी, इतर विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याकरीता स्पर्धकांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.