मराठा आरक्षणाचा वणवा जिल्ह्यातही भडकणार? उद्या देऊळगावमहीत रास्तारोको...
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे याचे उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालल्याने मराठा समाज बांधव प्रचंड आक्रमक झाले आहेत.आज बीड जिल्ह्यात आंदोलनाने उग्र रूप धारण केले, हॉस्पिटल, आमदाराचे घर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय पेटविण्यात आले.दरम्यान आता बुलडाणा जिल्ह्यातही मराठा आंदोलनाचा वणवा भडकण्याची चिन्हे आहेत.
खामगावात कालपासून उपोषण सुरू आहे. राहेरी, ताडशिवणी या गावात नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी त्यांची एल्गार रथयात्रा तूर्तास स्थगित केली आहे. अशातच उद्या,३१ ऑक्टोबरला देऊळगावमही येथे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे..उद्या सकाळी १० वाजता देऊळगावमहीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज व धनगर समाज बांधवांच्या वतीने रास्तारोको करण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हा रास्तारोको करण्यात येणार आहे..