आवडेल तेथे प्रवास योजनेच्या पासचे मिळणार स्मार्ट कार्ड

 
st
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः परिवहन महामंडळाकडून नव्याने स्मार्ट कार्डद्वारे आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना सुरू होत आहे. या योजनेत ४ दिवस व ७ दिवसचे पास हे स्मार्ट कार्डद्वारे मुख्य बसस्थानकावरून वितरीत करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

स्मार्ट कार्डद्वारे पास घेतल्यास प्रवाशांना नोंदणी एकदाच करावी लागणार आहे. दरवेळेस फॉर्म व फोटो द्यावा लागणार नाही. त्यामुळे वेळेची बचत होईल. या स्मार्ट कार्डवर फोटो उपलब्ध असल्यामुळे दुसरे फोटो ओळखपत्र बाळगण्याची गरज नाही.

ज्या ज्या वेळेस आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचा ४ किंवा ७ दिवसाचा लाभ घ्यावयाचा असल्यास स्मार्ट कार्ड केवळ टॉप अप करावयाचे आहे. टॉप अप कोणत्याही बसस्थानकावरून करता येणार आहे. स्मार्ट कार्ड असल्यानंतर ४ किंवा ७ दिवस तसेच साधी, शिवशाही बसचा दोन्हीही प्रकारच्या पासचे टॉप अप करता येणार आहे. प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.