अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी? आंदोलन, उपोषणे भरपूर झाली! सिंदखेडराजा तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांचा आता आत्मदहनाचा इशारा...

 
सिंदखेड राजा(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) वेळोवेळी आंदोलने, उपोषणे करून सुद्धा परिसरातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शासनाने नेहमी शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्षित केले. असा आरोप करत सिंदखेडराजा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत सिंदखेडराजा उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. 
  बालाजी सोसे आणि गजानन जायभाये असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. मागील वर्षी पळसखेड चक्का आणि गोंधणखेड शिवारातील शेतकऱ्यांचे अति पावसाने प्रचंड नुकसान झाले होते. दरम्यान, नुकसान भरपाई मिळावी यासाठी सोसे व जायभाये आणि आंदोलने केली. वेळप्रसंगी बऱ्याच दिवसांपासून अन्नत्याग उपोषण केले. प्रशासकीय स्तरावरून आश्वासन मिळाली परंतु प्रत्यक्षरीता शासनाने अजूनही शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली नाही. यामुळे शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलनाची घोषणा केली. १८ जून २०२४ पर्यंत मदत मिळाली नाही तर दोन्ही शेतकरी सिंदखेडराजा उपविभागीय कार्यालयासमोर आत्मदहन करतील असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.