व्हॉट्स ॲप ग्रुपचा असाही सदुपयोग! "सारथी" मित्रांनी गरजु अरबाज ला केली मोलाची मदत! आता छत्रपती संभाजीनगरात सुरू आहेत उपचार...

 
Bxbx
रायपूर(सादिक शाह:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हीच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे या उक्तीप्रमाण बुलडाणा जिल्हा सारथी मित्र परिवार काम करतोय..मग ते कुणाचा अपघात असो वा जळगाव जामोद संग्रामपूरात आलेली नैसर्गिक आपत्ती..गरजूंना मदत करण्यात सारथी ग्रुप नेहमीच आघाडीवर असतो..रायपूर येथील अरबाज खान फिरोज खान यांनाही सारथी ग्रुप ने मोलाची मदत केली आहे..
अरबाज खान टिनाच्या घरावर चढले असता टिनाच्या खालील बल्ली तुटून ते खाली पडले होते. या अपघातात टिनावरील दगड त्यांच्या डोक्यावर पडल्याने त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. अरबाज यांच्या आई वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने सारथी ग्रुप चे समाधान पाटील व सादिक शाह यांनी सारथी व्हॉट्स ॲप ग्रुपच्या माध्यमातून मदतनिधी जमा करण्याचे ठरवले..
   यात सर्व सारथी टीम ने अरबाज साठी एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला. या उपक्रमाला सर्वच सारथी परिवाराने प्रतिसाद देत आपापल्यापरीने योग्य ती मदत केली. दोन दिवसांत जी मदत संकलित झाली त्याचा धनादेश २३ ऑक्टोबरला सारथी परिवाराचे समाधान पाटील, सादिक शाह, मेहकरचे वसीम शेख, देऊळगाव महीचे सरफराज शप्पू शेख यांनी छत्रपती संभाजी नगरच्या साई न्युरोसिटी हॉस्पिटल ला जाऊन अरबाज च्या आईवडिलांना सुपूर्द केला.