व्वा क्या बात है,भारीच की! आयएसओ मानांकनाने उंचावली राजर्षी शाहू मल्टिस्टेटची मान

 
rs

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या दर्जेदार बँकिंग सेवेबद्दल राजर्षी शाहू मल्टिस्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटीला ९००१: २०१५ आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. एव्हीपी बिझनेस सोल्युशन इंडिया प्रा. लि. कंपनीचे संचालक पुरुषोत्तम गिरी यांच्या हस्ते संस्थाध्यक्ष मालतीताई शेळके, राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक भाऊसाहेब शेळके यांनी २३ सप्टेंबर रोजी हा सन्मान स्वीकारला. आयएसओ मानांकन मिळाल्याने संस्थेची मान उंचावली आहे. 

संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी ८ मे २०१३ रोजी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीची स्थापना केली. संस्थेच्या राज्य आणि राज्याबाहेर ६९ शाखा आहेत. ग्राहक, सभासद, ठेवीदारांना दर्जेदार सेवा उपलब्ध करण्याला संस्थेचे प्राधान्य असते. नाविन्यपूर्ण आणि ग्राहकांच्या हिताच्या योजना राबवण्यात येतात. शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिकांना पाठबळ देण्याचे काम संस्थेने केले आहे. 

दैनंदिन व्यवहार अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले जातात. अधिकारी, कर्मचारी यांना बँकिंग प्रशिक्षणाकरिता पाठवण्यात येते. त्यामुळे  प्रशिक्षित कर्मचारी ही संस्थेची जमेची बाजू आहे. वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, शेतकऱ्यांना बांधावर खत, आरोग्य शिबिर, कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिर, स्वर्गरथ, वनराई बंधारे आदी सामाजिक उपक्रमाद्वारे संस्थेकडून सामाजिक उत्तरदायित्व निभावले जात आहे.