क्या बात है! स्वातंत्र्यदिनी ५० हजार घरांत गुंजणार राष्ट्रगीताचे स्वर! वन बुलढाणा मिशनचे आयोजन; सहभागी होण्याचे संदीप शेळके यांचे आवाहन

 
Ss
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील ५० हजार घरांत एकाचवेळी राष्ट्रगीताचे मंजुळ स्वर गुंजणार आहेत. वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून 'घर तिथे राष्ट्रगीत' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. घरोघरी राष्ट्रगीत होणार असून जिल्हा संकल्प घेणार आहे. या राष्ट्रभक्तीपर उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले आहे. 
देशाला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देश मुक्त झाला. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी हा अविस्मरणीय दिवस आहे. राष्ट्रीय उत्सव म्हणून १५ ऑगस्ट देशभर साजरा करण्यात येतो. सर्वत्र देशभक्तीचा माहोल असतो. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 
देशाप्रती राष्ट्रप्रेमाची भावना व्यक्त करता यावी, अशी सर्वांची इच्छा असते. मात्र तशी संधी मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकाला देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी, यासाठी वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घरोघरी राष्ट्रगीत घेण्यात येणार आहे. वन बुलडाणा मिशनचे सदस्य घरोघरी जाऊन सामूहिक राष्ट्रगीत घेतील. शेतकरी, शेतमजूर, डॉक्टर्स, वकील, व्यावसायिक, पत्रकार, विद्यार्थी, खेळाडू, सरपंच, महिला, युवक, युवती, चालक, कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. राष्ट्रगीत झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ किंवा फोटो 7898984098 या नंबरवर व्हॉट्स अप करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या संस्थेने एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर राष्ट्रगीत घेण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.