संदीप शेळकेंच्या मनात काय? "वन बुलडाणा मिशन"चा टीझर महाराष्ट्रदिनी प्रसिद्ध;
जिल्ह्याचा आवाज दिल्लीच्या तख्तावर बुलंद करण्याच्या हालचालींना वेग येणार? शेवटी म्हणाले, बस थोडीशी प्रतीक्षा; राजकारणात प्रवेशाची शक्यता?

राजर्षी शाहू परिवाराच्या माध्यमातून संदीप शेळके यांनी जिल्हाभरात चांगलेच नेटवर्क उभे केले आहेत. सहकाराच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उभा करता यावा, स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठीही त्यांनी सुरू केलेली चळवळ आता चांगलीच मोठी झाली आहे. महिलांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर उभारण्याचे काम असो की पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना थेट बांधावर खताचा पुरवठा करून पेरणी महोत्सव साजरा करणे असो किंवा शेतकऱ्यांचा शेतमाल देश विदेशातील चांगल्या मार्केट मध्ये विक्री करण्यासाठी घेतलेला पुढाकार असो... भाषणबाजी पेक्षा "प्रत्यक्ष कृती कार्यक्रमावर" संदीप शेळकेंनी भर दिलाय. जिल्हाभरातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठिकठिकाणी घेतलेले रोजगार मेळावे देखील थेट "रिझल्ट" देऊन गेलेत. संदीप शेळके जे ठरवतात ते प्रत्यक्षात उतरवतात असा आजवरचा त्यांच्या कामाचा धडाका आहे. विशेष म्हणजे सध्यस्थितीत कुठल्याही राजकीय पक्ष किंवा संघटनेशी संबध नसतांना, राजकीय पद नसतांना देखील त्यांनी करून दाखवलेल्या कामांची चर्चा नेहमीच होत असते. त्यामुळे त्यांच्या टिझर ची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.
काय आहे टीझर मध्ये..!
"मागास जिल्हा अशी ओळख कायमची पुसून टाकण्यासाठी आणि जिल्ह्याचा आवाज दिल्लीच्या तख्तावर बुलंद करण्यासाठी लवकरच घेऊन येतोय....वन बुलडाणा मिशन! जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र आणणारे जिल्ह्याचे एक व्यासपीठ....बस थोडीशी प्रतीक्षा!" असे संदीप शेळके यांनी टीझर फेसबुक वर अपलोड केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे. संदीप शेळके यांच्या मनात नेमक काय चाललय? ते राजकारणात प्रवेश करणार का? राजकारण प्रवेश केलाच तर कोणत्या पक्षात प्रवेश करतील यासह अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळण्याची शक्यता आहे. संदीप शेळकेंच्या सामाजिक कामाचा पक्षवाढीला फायदा व्हावा, यासह आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला फायदा व्हावा यासाठी सर्वच राजकीय पक्ष संदीप शेळके यांना पक्षात घेण्यासाठी उत्सुक आहेत..संदीप शेळके काय निर्णय घेतात यावर जिल्ह्याच्या राजकारण्यांचेही लक्ष लागून आहे एवढे मात्र नक्कीच..