रविकांत तुपकरांच्या जामीन अर्जाचे काय झाले? अजून किती दिवस कारागृहात? अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकरांची प्रकृती बिघडली! वाचा न्यायालयात आज काय झालं अन् उद्या काय होऊ शकते ?

 
akola
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर त्यांच्या २५ साथीदारांसह सध्या अकोला कारागृहात आहेत.  आत्मदहन करण्याचा प्रयत्न, सरकारी मालमत्तेचे नुकसान तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. काल,१२ फेब्रुवारीला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, त्यानंतर त्यांना अकोला कारागृहात हलविण्यात आले होते. दरम्यान आज,१३ फेब्रुवारीला तुपकर यांच्या वकिलांनी जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतला आहे.

ugigui

           (जाहिरात👆)

न्यायालयाने सरकार पक्षाला नोटीस पाठवली असून उद्या १४ फेब्रुवारीला बाजू मांडण्याचे सांगितले आहे. मात्र असे असले तरी पोलीस बाजू मांडण्यासाठी काही दिवसांचा वेळ मागून घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाने सरकार पक्षाची विनंती मान्य केल्यास उद्या, तुपकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे. उद्या सुनावणी न झाल्यास तुपकर व त्यांच्या साथीदारांचा कारागृहातील मुक्काम ३ ते ४ दिवस वाढण्याची शक्यता आहे.
     
अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकरांची प्रकृती बिघडली...!

    दरम्यान ११ फेब्रुवारीला पोलिसांनी आंदोलन चिरडले, शेतकरी, पत्रकार, निरपराध तसेच वृद्धांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप करीत जोपर्यंत संबधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अन्नत्याग करणार असल्याचे जाहीर केले आहे. तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे.

   दामू अण्णा इंगोले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी..!
    
काल,१२ फेब्रुवारीला तुपकर यांचे सहकारी दामू अण्णा इंगोले यांना वाशिम जिल्ह्यातून अटक करून बुलडाणा येथे आणण्यात आले होते. आज त्यांना न्यायालयात दाखल केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, मात्र त्यांना अकोला कारागृहात नव्हे तर बुलडाणा कारागृहातच ठेवण्यात आले आहे.