काय सांगता? ५ वर्षापासून कृषीपंपाचे बिलच भरले नाही! बुलडाण्यात आता थकित वीज बिल वसुली

 
gjfh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनेक शेतकऱ्यांनी ५ वर्षा पेक्षा अधिक काळ लोटला तरी, महावितरणचे कृषीपंपाचे वीज बिल भरले नाही. बुलडाणासह अकोला, वाशिम येथील शेतकऱ्यांनी हे थकित कृषी पंप विज बिल अदा करावे असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले. वसुली कार्यक्षमता १३० टक्क्यापर्यंत वाढली तरच थकीत वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट शक्य होणार,असे प्रादेशिक संचालक सुभाष रंगारी यांनी एका बैठकीत निर्देश दिले.

विद्युत भवन अकोला येथे झालेल्या  परिमंडळ कार्यालयाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.या बैठकील प्रादेशीक कार्यालयाचे महाव्यवस्थापक(वित्त व लेखा)शरद दाहेदार,वाशिम, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याचे अधिक्षक अभियंते मंगेश वैद्य, ग्यानेश पानपाटील (प्रभारी), बद्रीनाथ जायभाय (प्रभारी), प्रणाली विश्लेषक राजेश दाभणे,गणेश भंडारी वरिष्ठ व्यवस्थापक  यांच्यासह परिमंडळातील सर्व कार्यकारी अभियंते व उपविभागीय अभियंते उपस्थित होते.

यावेळी प्रादेशीक संचालकाकडून परिमंडळाचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर  माहे जानेवारी-२३ या महीन्याचे  वसुलीचे उदीष्ट डिमांडच्या १३०%  देण्यात आले, याकरीता योग्य नियोजन करून कोणत्याही परिस्थितीत निर्धारित उदीष्ट पूर्ण करणे, त्याचबरोबर कृषी पंपाकडून वसुलीला प्रतिसादच मिळत नसल्याने,मागील पाच वर्षांपासुन व त्यावरील थकबाकीदार असलेल्या कृषीपंप वीज ग्राहकांकडून थकबाकी वसुल करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिलेत.तसेच मार्च २०२२ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंप ग्राहकांना मार्च २०२३ पर्यंत वीज जोडणी देण्याचे उध्दीष्ट असल्याने ते वेळेत पुर्ण करण्याचेही यावेळी त्यांनी निर्देशीत केले. त्याचबरोबर पाणीपुरवठा व पथदिव्यांची थकबाकी वसुली करीता संबंधित कार्यालय प्रमुखाची भेट घेवून पाठपुरावा करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्यात.पुढे बोलतांना प्रादेशीक संचालक म्हणाले की,वीज देयक हा महावितरणचा आत्मा आहे.शिवाय अचूक वीजबिल ग्राहकांना देणे ही महावितरणची जबाबदारी असल्याने अचूक देयके देण्यासाठी बिलींगची कार्यक्षमता ९० टक्के वा त्यापेक्षा जास्त येईल या करीता नियोजन करणे, कृषीपंप विज ग्राहकांचे बिलिंग नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सुचनाही यावेळी त्यांनी दिल्यात. दरम्यान परिमंडळातील जास्त वीज हानी असलेल्या वीज वाहिन्यांवर सतत वीज चोरी मोहिमा राबवित वीज हानी कमी करण्याचे दिलेले उद्दिष्ट  वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्या आहेत.