प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ काय? शेतकऱ्यांचे अर्ज नाकारून झाली क्रूर थट्टा! देऊळगाव राजा तालुक्यातील गोंधनखेड येथील शेतकऱ्यांचे "आमरण उपोषण!"
Updated: Feb 20, 2024, 15:02 IST
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पीक विमा मंजुर करून झालेल्या गारपीटीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी केलेल्या (विमा प्रस्ताव)अर्जाची कुठलीही दखल झाली नसल्याने देऊळगाव राजा तालुक्यातील गोंधणखेड येथील शेतकऱ्यांनी "आमरण उपोषणाला" आज २० फेब्रुवारीपासून सुरुवात केली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. मात्र पिक विमा स्टॅंडिंग क्रॉप ऐवजी हार्वेस्टिंग क्रॉप झाल्याने शेतकऱ्यांचे अर्ज नाकारण्यात आले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अन्यत्याग उपोषणाला सुरुवात केली. उपोषणकर्ते गजानन विश्वनाथ जायभाये यांच्या नेतृत्वात शेतकरी बांधवांनी उपोषणात सहभाग घेतला आहे. गोंदनखेड येथील शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र कंपनीने त्यांचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळे अजूनही शेतकरी विमाच्या प्रतीक्षेत आहेत.