क्या बात! मेहकर शहरात भरला आधुनिक ट्रॅक्टर पोळा! सजवलेल्या ट्रॅक्टरची निघाली मिरवणूक; शिवसेना शहर प्रमुख किशोर गारोळे यांची संकल्पना

 
ghjk

मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कृषीप्रधान असणाऱ्या आपल्या देशात पोळा सणाला अन्यनसाधारण महत्त्व आहे. शेतीत मशागत करणाऱ्या बैलांना सजवून मुळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु मागील काही काळापासून शेतकरी आधुनिक शेती करत आहेत त्यामुळे बैलांची जागा आता ट्रॅक्टरने घेतली असून पोळा या सणाच्या दिवशी मेहकर शहरात अनोखा ट्रॅक्टर पोळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  शिवसेना(उबाठा)चे शहर प्रमुख किशोर गारोळे यांच्या संकल्पनेतून भरला होता.

जानेफळ रोडवरील शिवसेना (उबाठा) संपर्क कार्यालयापासून या पोळ्याची सुरुवात झाली.शहर तसेच ग्रामीण भागातून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टर सजवून त्या ठिकाणी आणले होते. यावेळी सर्वप्रथम शिवसेना(उबाठा) उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे यांच्या हस्ते त्या ठिकाणी ट्रॅक्टरचे पूजन करून या पोळ्याला सुरुवात करण्यात आली. नंतर सजवलेल्या ट्रॅक्टरची मेहकर शहरातून भव्य अशी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. जानेफळ चौक येथून या ट्रॅक्टर मिरवणुकीला सुरुवात झाली.


 त्यानंतर जिजाऊ चौक,जुने बस स्टॅन्ड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका चौक, स्वर्गीय दिलीपराव रहाटे चौक या मार्गाने ग्रामदेवता शितलामाता मंदिरावर दर्शन घेत त्याच मार्गाने परत जानेफळ रोडवरील शिवसेना(उबाठा) संपर्क कार्यालय समोर या पोळ्याची सांगता करण्यात आली.यावेळी शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आपले आपले ट्रैक्टर घेऊन या पोळ्या मध्ये सहभागी झाले होते. या वेळी शिवसेना(उबाठा)चे तालुकाप्रमुख निम्बाजी पांडव,युवसेना तालुका प्रमुख आकाश घोड़े,नेते श्याम पाटील निकम,संदीप गवई, अमोल बोरे, भरत चेके,असलम शाह,शेख खलील आदि सह पदाधिकारी शेतकरी बांधव उपस्थित होते.