क्या बात! मंगेश भारसाकळेंच्या उपोषणाला ऐतिहासिक यश! पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळणार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव...

 
खामगाव(संतोष देठे पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव मिळणार आहे. केंद्रीय उड्डाणमंत्र्यांनी या मागणीचा विचार करून राज्य सरकारकडे प्रस्ताव मागितल्याने या विषयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी सातत्याने संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचाचे प्रदेश अध्यक्ष मंगेश भारसाकळे यांनी विविध आंदोलने केली आहेत. त्यामुळे भारसाकळे यांचे हे मोठे यश असल्याचे मानले जात
खामगाव(संतोष देठे पाटील:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लवकरच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव मिळणार आहे. केंद्रीय उड्डाणमंत्र्यांनी या मागणीचा विचार करून राज्य सरकारकडे प्रस्ताव मागितल्याने या विषयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे या मागणीसाठी सातत्याने संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचाचे प्रदेश अध्यक्ष मंगेश भारसाकळे यांनी विविध आंदोलने केली आहेत. त्यामुळे भारसाकळे यांचे हे मोठे यश असल्याचे मानले जात असून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे..
 याच महिन्यात ९ ऑगस्ट पासून क्रांती दिनाच्या पर्वावर मंगेश भारसाकळे खामगाव येथे अनिश्चित कालीन आमरण उपोषण केले होते. पुणे येथील विमानतळास जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी प्रमुख मागणी यावेळी त्यांनी केली होती. शिवाय हीच मागणी घेऊन श्री भारसाकळे यांचा लढा २०११ पासून सुरू होता. २०२२ मध्ये छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात श्री भारसाकळे यांनी हा प्रस्ताव पूर्ण ताकदीने मांडला होता. मध्यल्या काळात हा विषय मागे पडल्याने मंगेश भारसाकळे यांनी पुन्हा या विषयाला धरून आंदोलन पेटवले होते. आता स्वतः केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी या विषयाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मागितल्याने पुणे येथील विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लढ्याला यश; लवकरच मंगेश भारसाकळे यांचा नागरी सत्कार...
मंगेश भारसाकळे यांनी अतिशय ताकदीने हा विषय लावून धरला. वेळोवेळी या विषयाचा ते पाठपुरावा ते करीत राहिले. आता लढ्याला यश मिळत असल्याने कुणबी समाज बांधवांच्या वतीने लवकर मंगेश भारसाकळे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे...