क्या बात! ऐकावे ते नवलच ! गाईने दिला दोन वासरांना जन्म. चिखली तालुक्यातील अंचरवाडीची घटना
अंचरवाडी येथील स्वप्नपूर्ती स्कूल ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक एकनाथ परिहार मागील तीन पिढ्यांपासून गोधनाचा वारसा चालवीत आहेत. त्यांच्याच गोठ्यातील गाईने वासरांना जन्म दिला. त्यांच्याकडे ३० ते ४० गाई,१० म्हशी असा पशुधन साठा आहे. तसेच समृद्ध कृषी परंपरेत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
गाई वाचल्या पाहिजेत, भारत देशात गाईला आईचा दर्जा दिला जातो, त्याप्रमाणे त्यांची सेवा करून संगोपन करणे ही जबाबदारी आपली असून शेतकऱ्यांनी जैविक सुष्टीच्या वाढीसाठी योगदान द्यावे आणि गोपालन करावे अशी भावना परीहार यांनी बुलढाणा लाइव्ह शी बोलताना व्यक्त केली.
पशुतज्ञ काय सांगतात?
जुळे वासरे होतात तेव्हा जन्माच्या काही तासांत कोलोस्ट्रम प्राप्त होणे आवश्यक आहे, तरीही ते त्याच्या आतड्यांमधून त्याच्या रक्तप्रवाहात ऍन्टीबॉडीज शोषून घेऊ शकतात. गायीला साधारणपणे १ वासरू असते. जुळे होण्याच्या घटना दुर्मिळ असतात. गाईच्या गर्भात जेव्हा जुळ्या वासरांचा गर्भ वाढत असतो तेव्हा अनेक अडचणी येतात, काही प्रकरणात गाईच्या जिवालादेखील धोका असतो. जन्माला आलेली वासरे जन्मतःच अशक्त असतात, मात्र अंचरवाडी येथील या घटनेत दोन्ही वासरे सदृढ आहेत..