'हम पिछे बैठे है, दिखता नही क्या' म्हणे अन् धपा धप रट्टे टाकले! बुलढाणा शहरातील घटना..
May 28, 2024, 08:15 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातील भडेच भवन परिसरात चारचाकी वाहन चालकाला मारहाण झाल्याची घटना २५ मे, रोजी उघडकीस आली. याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चालक शेख मोहम्मद शेख हसन (रा. जोहर नगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली की, ते अनिस बागवान यांच्या मालकीची बोलेरो पिकप गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. २३ मे च्या रात्री ८ वाजेच्या दरम्यान, भडेच भवन परदेशीपुरा येथील अनिस बागवान यांच्या गोडाऊनवर गाडी रिव्हर्स असताना दोनजण जवळ आले. 'हम पीछे बैठे है दिखता नही क्या' असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली व चालक गाडीच्या खाली उतरल्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यात चालक शेख मोहम्मद शेख हसन यांना कानावर व कपाळावर मार लागला आहे. यावेळी चौकशी केली असता शुभम व अजय प्यारेलाल हडाळे असे मारहाण करणाऱ्या मुलांची नावे असल्याचे समजले. असे तक्रारीत म्हटले आहे.