पहा "त्यो" व्हिडिओ..सगळ कसं सहज मिळत चिखलीत...फक्त घरापुढे जाऊन तीनदा हॉर्न वाजवा...

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत अवैध धंद्यांना उत आलाय..पोलीस कारवाया करीत असले तरी त्याचा पाहिजे तेवढा धाक नाही..त्यामुळेच की काय चिखलीत सगळ काही सहज उपलब्ध होत...बुलडाणा लाइव्ह ने काल यासंबधीचे वृत्त प्रकाशित करून आज व्हिडिओ प्रसिद्ध करणार असल्याचे म्हटले होते, त्यानुसार आज हा व्हिडिओ प्रसिद्ध करीत आहोत..
व्हिडीओत काही कॉलेज तरुण एका घरात गांजा खरेदी करण्यासाठी जात असल्याचे दिसतेय. घरातील व्यक्तीच्या हातात कॉलेज तरुणाने पैसे टेकवल्यानंतर तो व्यक्ती एक पुडी तरुणांच्या हातात देतो. चिखली शहरातील बाबुलॉज चौक परिसर आणि साकेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घरांत सहजपणे घातक ड्रग्स कॉलेज तरुणांना उपलब्ध होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरासमोर जाऊन तीनदा हॉर्न वाजवल्यावर तो कशासाठी वाजवला ते घरातल्या मंडळीच्या ध्यानात येते, आणि त्यानुसार पुरवठा केला जातो. कॉलेज तरुण याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. गांजा आणि इतर घातक ड्रग्स शहरात येतात कुठून ? साठवणूक होते कशी याचा तपास पोलिसांनी करणे गरजेचे आहे..किमान पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही एवढ्या तरी दमदार कारवाया पोलिसांनी केल्याचं पाहिजेत ना....