बुलडाण्यात वारकरी बांधव आक्रमक ;जितेंद्र आव्हाडांचे पोस्टर जाळले !

 
Fxhj
बुलडाणा(बुलडाणा लाव्ह वृत्तसेवा): 'राम मांसाहारी होते' असे वक्तव्य करणे जितेंद्र आव्हाड यांना चांगलेच भोवले. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभर निषेध व्यक्त केल्या जात आहे. त्याचेच पडसाद आज ६ जानेवारीला बुलडाण्यात देखील पाहायला मिळाले. जिल्हाभरातील वारकरी संप्रदायातील बांधवांनी बुलडाण्यातल्या कारंजा चौकात आव्हाडांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला. सरकारने त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू. असा इशारा यावेळी वारकरी बांधवांनी दिला.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या मेळाव्यात राम मांसाहारी होता. १४ वर्षे वनवासात गेला होता. असं वक्तव्य केलं होतं. त्यावर ते आजही ठाम आहेत. राम हा आमच्या बहुजनांचा राम आहे. मी जे काही बोललो ते अभ्यासाशिवाय बोललो नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. असे आक्रमक झालेले आंदोलकांनी सांगितले.