केदारनाथला जायचयं? मग बुलडाण्यातच घ्या केदारनाथाची अनुभूती! बुलडाण्यातील संगम चौकात रुद्र गणेश मंडळाने साकारला डोळ्यांचे पारणे फेडणारा देखावा..
Sep 22, 2023, 10:27 IST
बुलडाणा(आदेश कांडेलकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यातील सर्व प्रथम असलेल रुद्र डोल पथक नावाजलेल आहे. यातूनच स्थापित झालेल रुद्र गणेश मंडळ वर्षानुवर्षे शहरातील संगम चौक परिसरात श्री गणेशाच्या मूर्तीची स्थापना करतायत. दरवर्षी मंडळातील सजावट देखणी असते. कधी डोळ्यांसमोर प्रत्यक्षपणे इतिहास दाखवणारे देखावे तर कधी डोळ्यांचे पारणे फेडणारी सजावट मंडळाने नेहमीच सादर केली आहे. यंदाही या मंडळाने आकर्षक असा देखावा सादर केलाय..प्रत्यक्ष केदारनाथ मंदिरात आपण आलो की काय असं वाटावं इतकं हुबेहूब भगवान केदारनाथाच मंदिर या रूद्र गणेश मंडळांन साकारलय..
रुद्र गणेश मंडळाकडून गणेश चतुर्थीला भगवान गणेशाची मूर्ती स्थापित करण्यात आली. आणि मंगळवारी विधीवत पूजन करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रुद्र ग्रुप कडून सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असतो. अनाथ मुलांना शैक्षणिक कार्यासाठी दत्तक घेणे, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासह विविध उपक्रम सामाजिक हिताच्या दृष्टिकोनातून रूद्र ग्रुपने राबविले आहे. यंदाचा भगवान केदारनाथाच्या मंदिराचा देखावा डोळ्यांचे पारणे फेडणारा असल्याच्या प्रतिक्रिया दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून व्यक्त होत आहेत..तुम्हालाही घ्यायचीय ना भगवान केदारनाथाच्या दर्शनाची अनुभूती मग या बुलडाण्याच्या संगम चौकातील रूद्र गणेश मंडळाने स्थापित केलेल्या बाप्पांच्या दर्शनाला...