व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्केंनी घेतली शरद पवारांची भेट! तासभर झाली चर्चा; कारण आहे "खास"...

 
Nfnf
बारामती(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी आज व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. बारामती येथील शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी ही भेट झाली.
  Tsmn
व्हॉईस ऑफ मीडिया या देशपातळीवरील सर्वात मोठ्या पत्रकारांच्या संघटनेचे राज्य अधिवेशन उद्या,१८ आणि १९ नोव्हेंबरला बारामती येथे होणार आहे. राज्यभरातील अनेक पत्रकार या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या पुर्वतयारीसाठी अनिल म्हस्के गेल्या काही दिवसांपासून बारामतीत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर या अधिवेशनाला उपस्थित राहणार असून मार्गदर्शन करणार आहेत. दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिष्टमंडळाला भेटीला बोलावले होते. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने गोविंदबागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती शरद पवार यांनी जाणून घेतली. याशिवाय काळाच्या ओघात बदलती पत्रकारिता यासह अनेक विषयांवर शरद पवार यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ज्येष्ठ पत्रकार तथा राज्यसभा खासदार कुमार केतकर हेदेखील यावेळी उपस्थित होते.