व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने जिल्हाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन! निमित्त पत्रकार दिनाचे! बुलढाण्यात ४ जानेवारीला महत्वाचा कार्यक्रम

 
Cvnm
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
 देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त जिल्हाभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील १३ तालुकाकेंद्रावर ४ ते १० जानेवारीदरम्यान हे कार्यक्रम होणार आहेत. जिल्हामुख्यालयी ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा पत्रकार भवनात कार्यक्रम होणार आहे. यासंबंधीची महत्वाची नियोजन बैठक आज,३० डिसेंबरला जिल्हा पत्रकार भवनात पार पडली.
४ जानेवारीला बुलढाणा येथील कार्यक्रमात प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव देखील करण्यात येणार आहे. याशिवाय व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने राबविण्यात आलेला आणि गतवर्षीचा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या पत्रकार व कुटुंबांच्या आरोग्य तपासणीच्या उपक्रमाची यावर्षी देखील आखणी करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन देखील यावेळी वरिष्ठांच्या उपस्थितीमध्ये केले जाणार आहे.