पत्रकारांच्या हक्कासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे लाक्षणिक उपोषण सुरू!राज्यभरातील शेकडो पत्रकारांचा सहभाग

 
Bcnx
नागपूर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क):पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. यशवंत स्टेडियम येथे सुरू असलेल्या या उपोषणात राज्यभरातील पत्रकार सहभागी झाले आहेत.
पत्रकारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी मिळावी, पत्रकार कल्याणकारी महामंडळ निर्माण करण्यात यावे, रेडीओ, टीव्ही आणि डिजिटल मीडियात काम करणाऱ्या मंडळींना श्रमिक पत्रकार संबोधण्यात यावे, पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, पत्रकारांसाठी गृहनिर्माण वसाहत निर्माण करून प्रत्येक जिल्ह्यात १०० घरांची निर्मिती करण्यात यावी, दहा वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे, यासह विविध १५ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर उपोषण करण्यात येत आहे.
व्हॉईस आॕफ मीडिया" चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे आणि राष्ट्रीय कार्यकारीणी पदाधिकारी यांचे मार्गदर्शनात पत्रकार हल्लाविरोधी समितीचे राज्य अध्यक्ष संदीप महाजन, व्हॉईस आॕफ मीडिया वर्धा जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, देवळी तालुकाध्यक्ष गणेश शेंडे, सेलु तालुकाध्यक्ष सचिन धानकुटे, किरण राऊत, मंगेश काळे, अनिल वांदीले यांचेसह व्हाॕईस आॕफ मीडियाचे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पदाधिकारी लढा पञकारीता आणि पञकारांसाठीचा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन दररोज लाक्षणिक उपोषणास बसणार आहेत. 
व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी उपोषणकर्त्याचे स्वागत करून मागण्यांच्या पूर्तेतेसाठी शुभेच्छा दिल्या.
आ. सत्यजित तांबे, आ. सुधाकर अडबाले, प्रकाश पोहरे यांची भेट
दरम्यान आज दिवसभरात नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, नागपूर विभागाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, देशोंनातीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, व्हींडीएनएचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी व्हॉईस ऑफ मीडियाच्या उपोषण मंडपाला सदिच्छा भेट देत पाठिंबा दर्शविला. पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा केली.