विदर्भभूषण माधवराव आरसोडे ! सामान्यांची काळजी करणारे असामान्य व्यक्तिमत्व! जाणून घेऊया हिवरा खुर्द ला शैक्षणिक गंगोत्री बनवणाऱ्या माधवराव आरसोडेंच्या कार्याबद्दल..

 
Ghhc
जानेफळ(अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) हिवरा खुर्द सारख्या छोट्याशा गावात आणि सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या  माधवभाऊंनी जे करून दाखवलंय त्याला तोड नाही. क्षेत्र कोणतेही असो, पद कोणतेही असो त्या क्षेत्राचा, आपल्या पदाचा फायदा आपल्या माणसांना झालाच पाहिजे हा कायमचा आग्रह माधवराव आरसोडे धरतात. त्यामुळे सामान्यांसाठी झटणारे असामान्य व्यक्तिमत्व असेच त्यांच्या कार्यकर्तुत्वाबद्दल म्हणता येईल. त्यामुळेच भाऊंच्या वाढदिवशी त्यांच्यावर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

२६ जानेवारी १९९७ ला संत ज्ञानेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था भाऊंनी जानेफळात सुरू केली. आज त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले. पतसंस्थेचा विस्तार  होऊन हिवराखुर्द, नायगाव दत्तापुर, कळमेश्वर येथेही शाखा स्थापन झाल्यात. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या साठवणुकीची व्यवस्था करण्यासाठी भाऊंनी ग्रामीण भागात धान्य गोदामाची व्यवस्था उभी केली. ग्रामीण भागात चांगल्या दर्जाच्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात यासाठीही भाऊंनी पुढाकार घेत जिजामाता बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि उच्च दर्जाचे शैक्षणिक दालन ग्रामीण भागात उभे केले.

आजघडीला जिजामाता विद्यालय, जिजामाता विद्यामंदिर, जिजामाता गुरुकुल, जिजामाता ज्युनिअर कॉलेज या दालनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी देशासाठी घडवण्याचे काम माधवरावभाऊंच्या कार्यकुशलतेने शक्य झाले आहे. त्यामुळेच एका बाजूला अनेक शैक्षणिक संस्था पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असताना जिजामाता शैक्षणिक परिवारात १९०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हिवरा खुर्द च्या छोट्याशा गावाला शैक्षणिक गंगोत्री मध्ये रूपांतरित करण्याचे श्रेय जाते ते माधवरावभाऊंनाच..! आज,१ मार्च ला माधवरावभाऊंचा वाढदिवस..! त्यांना उदंड आयुष्य लाभो, ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!!