दुष्काळाचा बळी! पळसखेड सपकाळ येथे शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ आहे, अपुऱ्या पावसामुळे उत्पादन घटले आहे. परिणामी शेतकरी संकटात असून आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे आज, २५ नोव्हेंबरला शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उजेडात आली.
Rdfb
श्याम हरिदास कापसे (३४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली . शेतकऱ्यावर भारतीय स्टेट बँकेचे कर्ज असल्याचे सांगितल्या जात आहे. शेतकऱ्याच्या पश्चात एक मुलगी, एक मुलगा ,पत्नी आई,वडील असा परिवार आहे.
Cvbn Dbnk