उभ्या उसाचा झाला कोळसा! देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपुरची घटना

 
Us
देऊळगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देऊळगाव राजा तालुक्यातील सुलतानपूर शिवारात शॉर्टसर्किट झाल्याने उभे उसाचे पीक जळल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकऱ्याने सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. 
   

सुलतानपूर येथील भानुदास संपतराव खंडागळे यांच्या गट न ६३आणि ६७ मध्ये एकूण तीन एकर उसाची लागवड करण्यात आली होती. ३ फेब्रुवारीला खंडागळे यांच्या शेतातील ऊस पेटला.याबाबतची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शिवारात धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत शेतकऱ्याचे जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले आहे. शेतातून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. उच्च दाबामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान महावितरण ने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.