संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम! रक्तदान शिबिर पंधरवड्याचा समारोप;तीन हजार पिशव्या रक्त संकलित! रक्तदान चळवळीच्या इतिहासाला नवा आयाम

 
Sandip
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त १३ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर पंधरवड्यात तीन हजार पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहे. संदीपदादा शेळके यांनी रक्तदान चळवळीच्या इतिहासाला नवा आयाम दिल्याचे दिसून येत आहे.

 Ghj

रक्तदान हे जीवनदान आहे. रुग्णास वेळेवर रक्त उपलब्ध झाले नाही तर अनर्थ घडू शकतो. राजर्षी शाहू परिवाराच्या वतीने नेहमीच रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. यावर्षी संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने २३ फेब्रुवारी ते १३ मार्च असा रक्तदान शिबिर पंधरवडा आयोजित करण्यात आला. राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्यावतीने हे आयोजन करण्यात आले. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर ७५  ठिकाणी शिबिरे घेण्यात आली. रक्तदात्यांना१ वर्षाचा १ लाख रुपयांचा मोफत अपघात विमा देण्यात येणार आहे. दरम्यान आज, १३ मार्च रोजी या रक्तदान शिबिराचा समारोप आहे. गर्दे वाचनालयाच्या सभागृहात सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 


२०० दुचाकींची निघणार रॅली 

सकाळी डोंगरखंडाळा ते बुलडाणा मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत २०० दुचाकीस्वार सहभागी होणार आहेत. स्वतः संदीपदादा शेळके सुद्धा रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे दुचाकी रॅलीत सहभागासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत आहे. 


युवा ऊर्जास्रोत पुस्तकाचे होणार प्रकाशन 

युवा उद्योजक संदीपदादा शेळके  युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. युवकांनी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभारला पाहिजे यासाठी त्यांची धडपड सुरू असते. अनेक युवकांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांनी उभे केले आहे. संदीपदादा शेळके यांचे कार्य युवकांना प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लेखक विनोद बोरे यांच्या 'युवा ऊर्जास्रोत' पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.