वन बुलढाणा मिशनतर्फे १०० बँकमित्रांना नियुक्तीपत्रांचे वाटप

 
Bxbxn
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलढाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या हस्ते १०० बँकमित्रांना नियुक्ती पत्र देण्यात आले. येथील बुलढाणा रेसिडेंसीमध्ये २० ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम झाला. 
यावेळी राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, सरव्यवस्थापक नितीन उबाळे, सापऍक्ट प्रा. लि. चे संस्थापक तथा सीईओ संदीप पाटील, आस्थापना अधिकारी कृष्णा सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकमित्रांना दैनंदिन कामकाजाबाबत तज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या समस्यांचे निराकरण करून मार्गदर्शन करण्यात आले. उद्यापासून बँक मित्र आपल्या शाखेवर रुजू होणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहेत. राजर्षी शाहू पतसंस्थेच्या सहकार्याने बँकमित्र संकल्पना राबविण्यात येत आहे. बँकेचे नवीन खाते उघडणे, पिग्मी खाते, गोल्ड लोन, संस्थेच्या कामाची माहिती देणे या व्यतिरिक्त कृषी, आरोग्य, शिक्षण, सहकारासह इतर कामे बँकमित्र करणार आहेत. 
जिल्ह्यात बेरोजगारी ही प्रमुख समस्या आहे. रोजगाराच्या शोधात तरुणाईचा लोंढा महानगरांमध्ये जातो. मात्र याकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून संदीप शेळके यांनी रोजगारावर लक्ष केंद्रित केले आहे. तर अनेक युवकांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध केला आहे. जिल्ह्याच्या विकासात याचा नक्कीच हातभार लागेल, अशा प्रतिक्रिया बँकमित्र यांनी यावेळी व्यक्त केल्या.