वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा आज मेहकर तालुक्यातील "या" गावांत पोहोचणार! शेंदला, खंडाळा देवी येथे होणार सायंकाळच्या सभा...

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या १० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या वन बुलडाणा मिशनच्या परिवर्तन रथयात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गावोगावी या यात्रेचे दमदार स्वागत होत असून संदीप शेळके यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या २ दिवसांपासून ही यात्रा मेहकर तालुक्यात आहे, आज मेहकर तालुक्यातील पुढील गावांचा प्रवास ही यात्रा करणार आहे.
Shelke
आज,१५ मार्चला सकाळी साडेआठला कल्याणा येथून यात्रा मार्गस्थ होईल. त्यानंतर ९ वाजता नायगाव दत्तापुर, साडेनऊ वाजता शेंदला, १० वाजता मोळा, ११ वाजता साब्रा,  दुपारी ४ वाजता लावना, साडेचार वाजता पिंप्री माळी, सायंकाळी ५ वाजता शहापूर, साडेपाचला भोसा आणि ६ वाजता खंडाळा देवी येथे ही परिवर्तन रथयात्रा पोहचणार आहे. यावेळी गावोगावी संदीप शेळके कॉर्नर सभांना संबोधित करणार आहेत. या रथयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वन बुलडाणा मिशनच्या वतीने करण्यात आले आहे.