सिंदखेडराजा तालुक्यात वन बुलडाणा मिशनची परिवर्तन रथयात्रा सुपरहिट! गावोगावी जंगी स्वागत; जांभोरा, चांगेफळ, रुम्हणा, धानोराच्या सभा गाजल्या!
संदीप शेळकेंची खा. जाधवांवर सडकून टीका; त्यांना घरचा रस्ता दाखवा म्हणाले
पुढे बोलतांना ते म्हणाले पुण्या - मुंबईकडे गेल्यावर तिकडचे लोक बुलडाण्याच नाव घेतल्यावर अचंबित पणे पाहतात, कुठे आहे बुलडाणा विचारतात. मग त्यांना संत नगरी शेगाव किंवा मातृतीर्थ सिंदखेडराजा , लोणार सांगावे लागते. एवढी मागास परिस्थिती बुलडाणा जिल्ह्याची आहे. बाहेरचे लोक बुलडाण्याला ओळखत सुद्धा नाहीत, इथल्या सत्ताधारी खासदारांनी बुलडाणा जिल्ह्याची विकासाच्या बाबतीत वाट लावली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना घरचा रस्ता दाखवण्याची संधी मतदारांना निर्माण झाली आहे. ते अजूनही विकासाच्या नावाने भुलथापा मारतील, वेगवेगळी आश्वासने देतील पण त्याला बळी पडू नका. आता जनतेची दाखवुन द्या,विकासासाठी वन बुलडाणा मिशनच्या चळवळीला साथ द्या असे आवाहन संदीप शेळकेंनी केले.
रोजगारनिर्मितीला देणार प्राधान्य
गावागावात होणाऱ्या कॉर्नर सभांमधून संदीप शेळके विकासाच्या मुद्द्यावर जोर देत आहेत. प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी, मोठे उद्योगधंदे त्यामाध्यमातून रोजगार निर्मिती करणार असल्याचे संदीप शेळके सांगत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भाववाढीसाठी संसदेत आवाज उठवणार असल्याचेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना २४ तास वीज आणि पाणी, पांधन रस्त्यांची सुविधा यासह शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले.