वन बुलडाणा मिशनच्या वतीने जिल्ह्यात १५० ठिकाणी ईद मिलनाचे कार्यक्रम! संदीप शेळके , मालतीताई शेळकेंचा सहभाग

 
Bhjh
बुलडाणा: वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलडाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्यावतीने काल,११ एप्रिलला जिल्ह्यात १५० ठिकाणी ईद मिलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्वतः संदीप शेळके, मालतीताई शेळके यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
रमजान हा पवित्र सण आहे, सामाजिक बांधिलकी देणारा सण आहे. आपण समाजासाठी जगले पाहिजे हा संदेश देणारा सण आहे असे संदीप शेळके ईद मिलन कार्यक्रमात मुस्लिम बांधवांशी संवाद साधतांना म्हणाले. बुलडाणा लोकसभा क्षेत्रात १५० ठिकाणी ईद मिलन कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. डोणगाव, बोडखा, बावणबीर, किन्होळा, जानेफळ यासह इतर ठिकाणच्या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने हिंदू - मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली.