अवैध वाहतूक करण्यासाठी विनानंबर वाहनांचा वापर, प्रशासनाचे दुर्लक्ष! जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; कारवाई करण्याची मागणी

 
साखरखेर्डा
साखरखेर्डा (लाइव्ह ग्रुप नेटवर्क):खडकपूर्णा नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाला विनानंबर वाहनांची माहिती देऊनही कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप करीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्रामीण पत्रकार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. 
निवेदनानुसार, खडकपूर्णा नदीपात्रातून ऑनलाइन रेतीची विक्री करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याची मुदत संपल्यानंतर काही विनानंबर वाहनातून साखरखेर्डा, मलकापूर पांग्रा, शेंदुर्जन येथे रेतीची अवैध विक्री होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी उपरोक्त बाबींची माहिती दिली असता डॉ. गंगाराम उबाळे यांनी तहसीलदार सचिन जैस्वाल यांना विनानंबर वाहनांची फोटोसह माहिती दिली, त्यावर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली; परंतु त्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या टिप्पर चालकांवर कारवाई करण्याची दिली असता डॉ. गंगाराम उबाळे यांनी तहसीलदार सचिन जैस्वाल यांना विनानंबर वाहनांची फोटोसह माहिती दिली, त्यावर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली; परंतु त्यावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. या टिप्पर चालकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदना केली आहे. निवेदन देताना ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक इंगळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन खंडारे, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, डॉ. गंगाराम उबाळे आदींसह इतर उपस्थित होते.