UPDATE खडकपूर्णा प्रकल्पातून विसर्ग वाढवला! ५३५२९.२३७७ क्युसेक्स विसर्ग सुरू; दरवाजे आणखी उघडले....

 
Buldhana
देऊळगावराजा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततदार सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प तुडूंब होत आहे. गत आठवड्यात तळ गाठलेला खडकपूर्णा प्रकल्प आता ९३ टक्के भरला आहे. त्यामुळे खडकपूर्णा प्रकल्पावर आधारित शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची चिंता मिटली आहे. आज सकाळपासून खडकपूर्णा प्रकल्पातून विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता सायंकाळी ४ च्या सुमारास विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. 
 धरणाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातील ५ दरवाजे १ मीटरने तर उर्वरित १४ दरवाजे ०.५० सेमी ने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्या नदीपात्रात ५३५२९.२३७७ क्युसेक्स एवढा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल असे खडकपूर्णा प्रकल्प पूर्ण नियंत्रण कक्षा द्वारे कळवण्यात आले आहे.