केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव सकाळी दिल्लीला गेले रात्री पुन्हा जिल्ह्यात येणार! उद्या, परवा जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रम ...

 
Fcch
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना.प्रतापराव जाधव मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काल,१३ जूनला पहिल्यांदा जिल्ह्यात आले होते. दिवसभर शेगाव ,खामगाव आणि मेहकर येथील स्वागत कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर आज,१४ जूनच्या सकाळी ते पुन्हा दिल्लीत पोहचले होते.दरम्यान आज रात्री पुन्हा ते जिल्ह्यात येत आहेत.रात्री साडेअकरा वाजता त्यांचे मेहकर येथे आगमन होईल. दरम्यान उद्या,१५ जून, १६ जून आणि १७ जूनच्या संध्याकाळ पर्यंत ते जिल्ह्यात आहेत. 
जिल्ह्यात विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्री या नात्याने जिल्ह्याची पहिली आढावा बैठकही ते घेण्याची शक्यता आहे.