केंद्रीय मंत्री ना.प्रतापराव जाधव मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्या प्रथमच जिल्ह्यात! आज मुंबईत येऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे घेणार दर्शन; उद्या शेगावात जंगी स्वागत होणार!

असा आहे दौऱ्याचा "मिनिट टू मिनिट"

 प्रोग्राम...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्या,१३ जून रोजी प्रथमच होमग्राउंड वर अर्थात जिल्ह्यात येणार आहेत. तत्पूर्वी आजच ना.जाधव मुंबईत पोहचणार असून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे ते दर्शन घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही ना.जाधव घेणार आहेत. आज १२ जूनच्या सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी ते मुंबई विमानतळावर पोहचणार आहेत. ११ वाजून ३० मिनिटांनी ते नंदगीरी विश्रामगृहावर येतील. त्यानंतर तिथून १२: ४५ वाजता तिथून निघून दीड १:१५ वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी ते अभिवादन करण्यासाठी दाखल होतील.
१ तास मुख्यमंत्र्यांशी चर्चा...
दुपारी सव्वादोन वाजता ना.प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल होतील. १ तास ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याची चर्चा करणार आहेत. त्यानंतर पावणेचार वाजता ना.जाधव मंत्रालयात पोहचणार आहेत. सव्वा तास ते राज्याच्या मंत्रालयात थांबतील,त्यानंतर साडेपाच वाजता ते सह्याद्री अतिथीगृह येथे पोहचणार आहेत. रात्री ९: १० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वरून रेल्वेने ते शेगावकडे प्रस्थान करतील..
जिल्ह्यातला कार्यक्रम असा...
उद्या १२ जूनच्या सकाळी साडेपाच वाजता ना . जाधव यांची शेगाव रेल्वे स्थानकावर आगमन होईल. त्यानंतर ते विश्रामगृहावर जातील.सकाळी ७ वाजता ते श्री.संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत.त्यानंतर पुन्हा ८ ते १० यावेळत शासकीय विश्रामगृहावर ना.जाधव यांचा वेळ राखीव आहे. १० वाजता शेगाववरून निघून ना.जाधव खामगाव येथे सव्वादहा वाजता स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या समाधीस्थळी पोहचणार आहेत. साडेदहा वाजता आ.आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानी फुंडकर परिवाराच्या कौटुंबिक सत्काराचा ते स्वीकार करतील. त्यानंतर साडेअकरा ते दुपारी २ वाजेपर्यंत ना.जाधव कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी खामगाव येथील शासकीय विश्रामगृहावर थांबतील. दुपारी २ वाजता निघून ३ वाजता मेहकर येथील निवासस्थानी पोहचतील.
परवा पुन्हा दिल्ली...
दरम्यान परवा म्हणजेच १४ जूनला ना.जाधव पुन्हा दिल्लीसाठी निघणार आहेत. सकाळी ५ वाजता समृध्दी महामार्गाने निघून सकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचतील. ७. ४० वाजता विमानाने निघून ९.२५ वाजता दिल्ली विमानतळावर पोहचणार आहेत. सकाळी १०.१० वाजता ना.जाधव अशोक रोड वरील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहचतील.