युनियन बँकेचा कर्ज वितरण मेळावा उत्साहात ! राधेश्याम चांडक म्हणाले, महिलांनी व्यवसायात उत्तुंग झेप घ्यावी; संदीप शेळके म्हणाले,जिल्ह्याच्या विकासात महिला बचतगटांचे योगदान मोठे

राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनअंतर्गत युनियन बँकेच्या बुलडाणा शाखेतर्फे महिला बचतगटांसाठी १२ सप्टेंबर रोजी कर्ज वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मंचावर बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके, श्री. वैद्य, श्री. सोनटक्के, युनियन बँकेचे विभागीय व्यवस्थापक अनुप तराळे, शाखा व्यवस्थापक रवींद्र चोपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना राधेश्याम चांडक म्हणाले, महिला सक्षमीकरणासाठी युनियन बँकेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. यावेळी १२७ महिला बचतगटांना ७ कोटी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्यात आले आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवण्याकरिता सुद्धा त्यांचा पुढाकार असतो. मेळाव्याला जिल्ह्यातील बचतगटांच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी युनियन बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जिल्ह्याच्या विकासात महिला बचतगटांचे योगदान - संदीप शेळके
जिल्ह्यातील खेड्यापाड्यात महिला बचतगटांचे जाळे विणले गेले आहे. एक आर्थिक चळवळ यामाध्यमातून कार्यरत आहे. जिल्ह्याच्या विकासात महिला बचतगटांचे मोठे योगदान आहे. राजर्षी शाहू परिवाराने महिला बचतगट चळवळीसाठी सदैव भरीव योगदान दिलेय. आतापर्यंत यामाध्यमातून बचतगटांच्या ३५ हजार महिलांना १५० कोटींचे अर्थसहाय्य केले आहे. भविष्यातही महिला सक्षमीकरणासाठी आपला पुढाकार राहील. युनियन बँकेने एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले. महिला बचतगटांना पाठबळ देण्याची युनियन बँकेची भूमिका स्वागतार्ह असून त्याबद्दल राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी बँक प्रशासनाचे कौतुक केले.