दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्या; चौघे गंभीर! देऊळघाटजवळची घटना
Oct 21, 2023, 17:05 IST

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन मोटारसायकली समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले. आज,२१ ऑक्टोबरच्या दुपारी देऊळघाटजवळ हा अपघात झाला.
अब्दुल अजीज शहाबोद्दीन(३५ रा.धरणगाव, जि जळगाव) व अलीम अहमद इनामदार(५०, रा.शिरपूर, जि.जळगाव) हे दोघे दुचाकीने बुलडाण्याकडे येत होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या नांदुरा तालुक्यातील भोटा येथील राहणाऱ्या अक्षय पुरुषोत्तम घुले (२२) व राहुल कैलास घुले (२५) यांच्या दुचाकीने त्यांना धडक दिले. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील चौघे गंभीर जखमी झाले. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमींना रुग्णालयात भरती केले.